काँग्रेसनं ज्योतिरादित्य सिंधियांवर सोपवली मोठी जबाबदारी ! मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंगांचं नाव देखील नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे भलेही कोणते मोठे पद नाही मात्र पक्ष त्यांच्यावर खुप विश्वास ठेवत आहे. कारण हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांनंतर सिंधिया यांना झारखंडची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंत्री उमंग सिंघार यांची देखील या कामासाठी निवड करण्यात आलेली आहे.

लवकरच झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. अशातच काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची नावे घोषित केलेली आहेत. यामध्ये राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अध्यक्ष सोनिया गांधी, माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच यामध्ये कमलनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री उमंग सिंघार यांचे देखील नाव आहे. सिंघार यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर अनेक आरोप केले होते.

मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचे नाव नाही –

यादीमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांची नावे आहेत. मात्र लोकसभेसाठी प्रचंड कष्ट घेतलेल्या प्रियांका गांधी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत दिग्विजय सिंह यांचे नाव नाही. त्यातच मध्यप्रदेशचे मंत्री उमंग सिंघार यांचे नाव मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.

Visit : Policenama.com