अर्णब गोस्वामींच्या विरूध्द तात्काळ ‘केस’, आमदार इरफान अन्सारी यांनी देखील केली ‘तक्रार’

रांची : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरूद्ध टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी अमर्यादित वक्तव्य केल्याने वादात सापडला आहे. त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात सातत्याने गुन्हे दाखल होत असून झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार डॉ. इरफान अन्सारी आणि झारखंड प्रदेश काँग्रेस रिसर्च विंगचे चेअरमन अजयनाथ शाहदेव यांनीही गुरुवारी अर्णब विरोधात रांचीच्या जगन्नाथपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेश ठाकूर यांनी बोकारोमध्ये तक्रार दाखल केली आहे.

इरफान अन्सारी म्हणाले की, पालघर हल्ल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर रिपब्लिक चॅनल सतत जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात वापरली जाणारी अमर्यादित भाषा खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी कार्यक्रमाची सीडी देखील पोलिस स्टेशनला दिली असून त्याला अटक केली पाहिजे, असे इरफान अन्सारी म्हणाले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन प्रेस कौन्सिल रिपब्लिक टीव्ही चॅनलवर बंदी आणावी.

काँग्रेसच्या कुमार राजाने रांची आणि काँग्रेसचे नेते फुरकान अन्सारी यांची मुलगी शबाना खातून यांनी अर्णब विरोधात देवघरच्या मधुपुरमधील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जमशेदपूरमध्ये युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीव रंजन, नेते फिरोज खान, युवा कक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.परितोषसिंह, बिजेंद्र साहू, जगदीश महतो आणि रोहित पाल यांनी गुरुवारी टेल्को आणि मानगो पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज केला आहे. महागामाच्या आमदार दीपिका पांडेय सिंह यांनी बुधवारी रात्री अर्णब विरोधात महागामा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्याचप्रमाणे बुधवारी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेश सरचिटणीस राजन सिंह राजा यांनी अर्णब विरोधात खलारी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.

अर्णब विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआरसाठी अर्ज
रिपब्लिक टीव्हीचे अँकर, संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी याच्याविरोधात रांची येथेही गुन्हा दाखल करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या विरोधात भारतात धार्मिक उन्माद पसरवण्याचा आरोप, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अपशब्द आणि इतर आरोप आहेत. या आरोपांवर झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सह प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष कुमार राजा यांनी अर्णब गोस्वामी विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज केला आहे. यात अर्णब गोस्वामी यांनी महाराष्ट्रातील पालघरमध्ये मॉब लिंचिंग विषयीच्या वादविवाद कार्यक्रमात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अपशब्द वापरले, हिंदू समाजाविरूद्ध अपशब्द आणि धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती
अर्णब गोस्वामी विरूद्ध कलम ११७, १२०बी, १५३, १५३ए, २९५ए, २९८, ५००, ५०४, ५०५, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम १८६०आर/डब्ल्यू कलम ६६ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.