काँग्रेसचे ‘हे’ 29 दिग्गज आहेत विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार, जाणून घ्या

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस 125, राष्ट्रवादी 125 आणि मित्रपक्ष 38 जागांवर लढणार आहे. त्यानंतर आज काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रभारींची यादी जाहीर झाली असून आज काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. त्यापैकी काही जणांनी यावेळी भाजपात प्रवेश केला आहे  तर अजून काही जण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची  शक्यता आहे. यादीत खालील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची  शक्यता आहे.

 1. अशोक चव्हाण – भोकर
 2. पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण
 3. बाळासाहेब थोरात – संगमनेर
 4. विश्वजीत कदम – पलूस-कडेगाव
 5. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
 6. पी. एन. पाटील – करवीर
 7. अमित देशमुख – लातूर
 8. धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
 9. विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
 10. केसी पडवी – अक्कलकुवा
 11. नसीम खान – चांदवली
 12. वर्षा गायकवाड – धारावी
 13. अमीन पटेल – मुंबादेवी
 14. यशोमती ठाकूर – तिवसा
 15. अमर काळे – आर्वी
 16. सुनील केदार – सावनेर
 17. हर्षवर्धन सपकाळ – बुलढाणा
 18. माणिक जगताप – महाड
 19. रमेश बागवे – पुणे कॅन्टॉन्मेंट
 20. कैलास गोरंट्याल – जालना
 21. कल्याण काळे – फुलंब्री
 22. सुरेश वरपूडकर – परभणी
 23. डॉ. संतोष तारफे – कळमनुरी
 24. वसंत पुरके – राळेगाव
 25. रणजित कांबळे – वर्धा
 26. बसवराज पाटील – औसा
 27. मधुकर चव्हाण – तुळजापूर
 28. वसंत चव्हाण – नायगाव
 29. डी पी सावंत – नांदेड उत्तर

Visit – policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like