Congress | काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट! 2014 मध्ये युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शिवसेनेचा होता प्लान, एकनाथ शिंदेंसह आले होते वरिष्ठ नेते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress | राज्यात 2014 मध्ये सत्तेत असलेल्या भाजपासोबतची (BJP) युती तोडून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून (Shivsena) आला होता. आणि हा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते आले होते, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

 

अशोक चव्हाण यांनी म्हटले की, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

 

अशोक चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर त्यास तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनीही दुजोरा दिला आहे. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 2014 ला शिवसेनेशी चर्चा झाली होती, अशोक चव्हाण खोटे बोलत नाहीत. जर 2014 साली राष्ट्रवादीने आधीच बाहेरून पाठिंबा जाहीर केला नसता तर वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.

माणिकराव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे तो विषय पुढे जाऊ शकला नाही.
शिवसेनेचे नेते आमच्याकडे त्यावेळी प्रस्ताव घेऊन आले होते.
पण राष्ट्रवादीशिवाय सरकार बनवणे शक्य नव्हते. त्यामुळे तिथेच सगळे थांबले.
भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा विषय सुरू होता.
मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला या प्रस्तावाची पूर्ण कल्पना होती.
आताच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाच्या जाळ्यात आता ओढण्यात आले आहे.

 

2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष वेगळे लढले होते.
निवडणुकीनंतर भाजप हा 122 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता.
निवडणुकीचे निकाल लागताच राष्ट्रवादीने भाजपाला न मागता बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता.

 

Web Title :- Congress | former chief minister ashok chavan shocker over
eknath shinde 2014 planning congress targets ncp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा