पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसनं दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने पहिली राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राज्यातील मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती.

राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद न दिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसच्या हायकमांडकडून मोठी राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये जाहीरनाम्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसने विशेष कमिटी स्थापन केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची मध्य प्रदेशमधील समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्ता कट केला. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होणार अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –