काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ संपले ! विमाना ऐवजी नेत्यांना करावा लागणार रेल्वेने प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या आर्थिक तंगी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने अनावश्यक पद्धतीने होणार खर्च टाळण्याचे आदेश आपल्या नेत्यांना दिले आहेत. यात प्रवासासोबतच पाहुण्यांच्या चहापानावर देखील विचार करण्यास सांगितले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने आपल्या अकाउंट विभागातील महासचिव आणि राज्य प्रभारींना तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, चहा नाश्ट्यावरील खर्चासाठी दर महिन्याला तीन हजार रुपये एवढी मर्यादा ठेवा आणि जर या पेक्षा अधिक खर्च झाला तर त्याची भरपाई संबंधित व्यक्तीला करावी लागेल.

पक्षाच्या नेत्यांना आणि अन्य पदाधिकाऱ्यांना काँग्रेस कमिटीच्या कॅंटीनमधून चहा नाष्टा दिला जातो आणि पदाधिकारी बिलावरती सही करतात आणि ही सर्व बिले काँग्रेस अकाउंट विभाग भरत असे. या व्यतिरिक्त पक्षाने नेत्यांना जवळच्या अंतरावर जाण्यासाठी विमान ऐवजी रेल्वेचा वापर करण्यास देखील सांगितले आहे.

काँग्रेसच्या फंडिंगमध्ये मोठा हिस्सा उद्योगपतींचा आहे जो की आता हळू हळू कमी होऊ लागले आहेत. भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे इलेक्टोरल बॉन्ड्स मार्फत खूप कमी फंड येत आहेत.

Visit : Policenama.com