‘काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि प्रियांका गांधी यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली. राफेल विमानासोबतच इतरही अनेक मुद्यांवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मोदी सरकारवर बोचरी टीका केली. काँग्रेसने केलेल्या टीकेचा मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे असे म्हणत प्रकाश जावडेकर यांनी गांधी घराण्यावर आपली तोफ डागत निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस खोटारडेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश जावडेकर म्हणाले की, “काँग्रेसचे सरकार जिथे जिथे आले तिथे आम्ही कर्जमाफी दिली असे काँग्रेस सांगत आहे परंतु हेच त्यांचं सर्वात मोठं खोटं आहे असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “काँग्रेस कर्जमाफीच्या नावाखाली केवळ खोटे बोलत आहे. राजस्थानात वसुंधरा सरकारने 8 हजार करोडची 50 हजार पर्यंतची कर्जमाफी केली. परंतु यांनी फक्त 2 हजार करोडची कर्जमाफी केली आहे आणि ती देखील काही थोड्या शेतकऱ्यांचीच. कर्नाटक मध्ये तर यांनी काहीच केले नाही. पंजाबमध्ये 2 वर्ष उलटूनही त्यांनी काहीच केले नाही. मध्यप्रदेश छत्तीसगड अशा प्रत्येक ठिकाणी काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे. आम्ही काँग्रेसची पोलखोल करू” अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना जावडेकर म्हणाले की, “2008 मध्ये जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा कमीत कमी लोकांना कर्जमाफीचा अनुभव तरी मिळाला होता. परंतु आता तर तसे काहीच नाही. एकूण 12 करोड शेतकऱ्यांपैकी 4 करोड शेतकऱ्यांना मोदींनी 2 हजारचा पहिला हप्ता वितरीत केला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षात असे 2 हजार रुपयांचे 3 हप्ते 10 वर्षांसाठी दिले जाणार आहे.” असेही प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

मला वाटलं होतं की ते थोडं आत्मपरिक्षण करतील की, आज काँग्रेसची अशी दशा का झाली परंतु असे काही होताना दिसत नाही असे म्हणत प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. इतकेच नाही तर, महात्मा गांधीजीने जिथे काम केले तेथे तरी राहुल गांधी खरे बोलतील असे वाटले होते परंतु त्यांनी त्यांचे खोटे बोलणे सुरुच ठेवले आहे. ते गांधी सत्य बोलायचे परंतु हे गांधी खोटे बोलतात असे म्हणत जावडेकरांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

‘या’ प्रकरणात सापडल्याने पोलीस हवालदाराचे निलंबन

शरद पवारांनी समंजस्य दाखवले असते तर सुजय भाजपात गेले नसते : अशोक चव्हाण

पवारांची खेळी : सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘यांचे’ नाव चर्चेत कोणाचे नाव आहे चर्चेत हे वाचा सविस्तर

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची माहिती

अपेक्षित थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित न केल्याने वितरकांना चोपले वाचा सविस्तर आणि पहा विडिओ 

You might also like