काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष काळभोर यांचा राजीनामा, परिसरातील ‘बुरुज’ ढासळला

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – हवेली तालुका काॅंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवदास प्रल्हाद काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष व प्रदेश कमिटीकडे दिला. यामुळे हवेलीतील काॅंग्रेसचे असणारे थोडेफार अस्तित्वही संपुष्टात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेसला लागलेली गळती थांबत नाही. नुकतेच भाजपात दाखल झालेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ हवेलीतील त्यांचे खंदे समर्थक हवेली तालुका काॅंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवदास प्रल्हाद काळभोर यांनी आपल्या पदाचा दिला. त्यामुळे हवेलीतील काॅंग्रेसचे अस्तित्व केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे.

शिवदास काळभोर यांनी काॅंग्रेसचा विचार हवेलीत गेली अनेक वर्षे अस्तित्वात ठेवला अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करून काम उभारले होते.