सर्वांना धक्का देत काँग्रेसला इतक्या जागांवर विजयी होण्याचा अंदाज : सर्व्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले. त्यात भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. परंतू काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतून हाती आलेल्या अंदाजानुसार काँग्रेसला 50 – 35 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने 89 जागांवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे असे झाल्यास सतत टीका होणाऱ्या काँग्रेससाठी हा दिलासा असल्याचे मानले जात आहे.

दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यंदा लातूरातून निवडणूकीच्या मैदानात आहेत. अमित देशमुख लातूर शहरातून तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणमधून निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते. या दोघांनी भाजपसमोर मोठे तगडे आव्हान निर्माण केले आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतून हे दोघे देशमुख बंधू विजयी होतील अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया 21 तारखेला पार पडली. त्यानंतर आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. आता राज्यात आघाडी भाजपला धोबीपछाड देणार की युती सरकार सत्ता स्थापन करणार याचे औत्सुक्य वाढले आहे.

निवडूकीचा गुलाल उद्या उधाळण्यात येईल. उद्या सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर फक्त 20 – 25 मिनिटात पहिला कौल समोर येईल. त्यानंतर कोणता उमेदवार आघाडीवर कोणता पिछाडीवर हे निकाल हाती येता येता कळेल. दुपारी 1 पर्यंत जवळपास सर्व मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Visit : Policenama.com