काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काल सकाळी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असून त्यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.दरम्यान याच भेटीवरून तर्क वितर्क काढले जात असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची टीका केली आहे.

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवरून काँग्रेस गाढवपणा करणार असे वाटलेच होते. भेटीचं राजकराण करणं काँग्रेसवाल्यांना चांगलच जमत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. निवडणूक हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असते. मात्र असे डावपेच करणाऱ्यांना निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.
सुशिलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उलटसुटल चर्चा सुरू होत्या. प्रकाश आंबेडकर यांनी सुशिलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिला. ‘वंचितचा काँग्रेसला पाठिंबा’ अशा अफवांना उत आला होता. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत टीका केली आहे. भेटीचे राजकारण करणं हे फक्त काँग्रेसला जमत आणि राजकारण करणाऱ्यांना लोक जनता धडा शिकवेल असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

प्रकाश आंबेडकर बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे त्यावेळी तिथे पोहोचले होते. प्रकाश आंबेडकर हॉटेलमध्ये असल्याचं कळताच सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली होती.

sushilkumar-prakash

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like