सोनिया गांधींच्या बैठकीआधीच NSUI च्या प्रभारीचा राजीनामा !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय (NSUI) च्या प्रभारी रुची गुप्ता (Ruchi Gupta) यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांच्यावर निशाणा साधत राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव रुची गुप्ता यांनी एनएसयुआय रुची गुप्ता यांनी एनएसयुआयमध्ये संघटनात्मक फेरबदलासाठी होत असलेल्या विलंबामुळं राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.

मी राजीनामा दिला आहे. सर्वांना माहित आहे की, गेल्या काही दिवसांपासून संघटनेमधील अंतर्गत बदल खूप काळापासून प्रलंबित आहेत. संघटन महासचिवांकडून होणाऱ्या या विलंबामुळं संघटनेचं मोठं नुकसान होत आहे. वारंवार काँग्रेस अध्यक्षांकडं ही गोष्ट घेऊन जाणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही असं रुची गुप्ता यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिल्या आहेत.

https://twitter.com/guptar/status/1340126776383602688?s=20

वरिष्ठ नेत्यांसोबत सोनिया गांधींची बैठक

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलवली आहे. याच दिवशी रुची यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील नाराज नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी या नेत्यांनी पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाची मागणी करत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं.

महसचिव केसी वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीत महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार नाहीत. त्यात आता रुची गुप्ता यांनीही राजीनामा देऊन पक्षांतर्गत वाद टोकाचे असल्याचं निदर्शनास आणून दिलं. काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात रुची यांना डच्चू मिळणार होता. परंतु त्याधीच त्यांनी राजीनामा दिल्यानं आता पक्षातील लोकही हैराण झाले आहेत.