पुण्यात काँग्रेसकडून मूक मोर्चाचे आयोजन : रमेश बागवे

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

केंद्रात भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत .लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली एक ही आश्वासने पूर्ण करण्यात भाजप चार वर्षात अपयशी ठरले असून त्यांच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या निषेधार्थ २७ मे रोजी महात्मा फुले मंडई ते स्वारगेट येथील जेधे पुतळा पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध नोंदवला जाणार आहे.अशी माहिती माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी आयोजित परिषदेत दिली.

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात हे सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली एक ही आश्वासनाची पूर्तता केली नाही.उलट समस्या वाढल्या असून दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुशकील झाले आहे. यामुळे २७ मे रोजी महात्मा फुले मंडई ते स्वारगेट दरम्यान मूक मोर्चा आयोजित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.