काँग्रेस नेत्या अलका लांबांच्या अडचणीत वाढ, उन्नावनंतर लखनऊमध्ये FIR दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हायकोर्टवर आक्षेपर्ह टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलका लांबा यांच्याविरुद्ध लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अलका लांबा यांच्या विरोधात उन्नाव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलका लांबा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हायकोर्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 25 मे रोजी अलका लांबा यांनी ट्विट केलं होतं. यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या बाल कल्याण आणि संक्षरण आयोगाच्या सदस्य डॉ. प्रीति वर्मा यांनी अलका लांबा याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

बाल कल्याण आणि संक्षरण आयोगाच्या सदस्य डॉ. प्रीति वर्मा म्हणाल्या, अलका लांबा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. एवढच नाही तर हायकोर्टाच्या न्यायाधिशांच्या प्रतिष्ठेवर सवाल उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील दिल्लीतील तिहार तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या कन्येनं अलका लांबा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सेंगर यांच्या मुलीने उन्नावचे पोलीस अधीक्षक यांची भेट गेतली होती. लांबा यांनी केलेल्या ट्विटच्या आधारावर त्यांच्यविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.