लातूरमध्ये काँग्रेसचं काय होणार ? सख्ये भाऊ अमित आणि धीरज देशमुख निवडणुकीच्या मैदानात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो. सध्या लातूरमध्ये काँग्रेसची धुरा विद्यमान आमदार अमित देशमुख सांभाळत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसला लातूरमध्ये भक्कम ठेवण्याचे काम कोणी केले असेल तर ते अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी. अमित देशमुख यांचं बोलणं, आवाज, वागणं असं सगळं काही विलासरावांसारखंच आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती वलय आहे. यंदाच्या निवडणुकीत धीजर देशमुख मैदनात उतरण्याची शक्यता आहे. मोदी लाटेमुळे हा जिल्हा बराच भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे लातूरचा हा गड काँग्रेस राखणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विलासरावांनंतर काँग्रेसची लातूरमधील धुरा अमित देशमुख यांनी समर्थपणे पेलली. इंजिनिअर असलेले अमित 1999 पासून लातूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा ते निवडून आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काही काळ राज्यमंत्री म्हणूनही काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. अमित यांनी 2008 मध्ये अभिनेत्री अदिती घोरपडे यांच्या लग्नगाठ बांधली.

धीरज देशमुख 2013 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचं जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात मांजरा, विकास आणि रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराचे मोठे जाळे तयार केले आहे. याच्याच जोरावर आता ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. धीरज आता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. धीरज यांनी लडनमधून आपलं एमबीए केलं आहे. निर्माते वासू भगनानी यांची मुलगी दीपशिखाशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

एकीकडे देशमुख बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत परंतु 2014 च्या मोदी लाटेनंतर काँग्रेसचा गड मानला जाणारा लातूर जिल्हा भाजपच्या ताब्यात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती या भाजपच्या ताब्यात आहे. लातूर जिल्हा परिषद आणि लातूर महानगरपालिकेवरही भाजपचं वर्चस्व आहे.

लातूरमध्ये सध्या देशमुख कुटुंबाची जोरदार चर्चा आहे. कारण आता देशमुख बंधू निवडणूक लढणार असल्याने काका दिलीपराव देशमुख, आई वैशाली देशमुख, भाऊ रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख असे सगळे पुन्हा प्रचारात उतरणार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीतही अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अख्खं देशमुख कुटुंब मैदानात उतरलं होतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like