संघटीत भ्रष्टाचारातून मिळालेल्या निधीमुळे भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तीन युद्धे झाली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात एक लाख पाकिस्तान सैनिक शरण आले आणि बांग्लादेशाची निर्मिती झाली. परंतू पंडीत नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींनी त्याचा उपयोग निवडणुक प्रचारासाठी केला नाही. कॉंग्रेसला देशभक्ती परंपरेने मिळाली आहे. सव्वाशे कोटी जनतेला तिरंग्याचा अभिमान आहे, तो दाखवायची गरज भासत नाही. याउलट चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडत असताना अर्थतज्ज्ञांशी चर्चा करून देश मंदीच्या खाईतून बाहेर काढणे, बेरोजगारीवर काय उपाय योजीले हे सांगायची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी कलम ३७० हटविल्याच्या घटनेला प्रचाराचा मुद्दा बनवत आहेत, हे दुर्दैव आहे या शब्दात कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा यांनी भाजपवर शरसंधान केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. तत्पुर्वी कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, माजी खासदार शालिनीताई पाटील, सोनल पटेल, मोहन जोशी, शरद रणपिसे, प्रशांत जगताप, अभय छाजेड आदी पदाधिकारी उपस्थित होते. आनंद शर्मा म्हणाले, की भाजप वास्तवापासून पळत असून मतदारांची दिशाभूल करत आहे. स्वातंत्र्यानंतर देश सर्वात मोठ्या मंदीच्या कालावधीतून जात असताना देशाचे पंतप्रधान स्वत:ची छबी निर्माण करण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा वेठीस धरत आहेत. काश्मिरची निवडणुक आल्यानंतर कलम ३७० वर बोलण्यात गैर काहीच नाही. मात्र, येथील निवडणुकांमध्ये पाच वर्षांपुर्वी दिलेल्या आश्‍वासनांची काय पुर्तता केली. मंदीमुळे कंपन्या बंद पडत आहेत, रोजगार ऐतिहासिक पातळीवर घटला आहे, देशाची अर्थव्यवस्था दुबळी झाली आहे, यावर बोलले असते तर अधिक आनंद झाला असता.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रीय उत्पन्न चारपटीने वाढले. हा जागतिक उच्चांक आहे. परंतू नरेंद्र मोदींच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रीय उत्पन्न घटले आहे. देश आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. पुर्वी कंपन्या तीन शिफ्टमध्ये चालत होत्या. आता कंपन्यांना टाळे लावले जात आहे. बेरोजगारी ऐतिहासिक निचांकावर पोहोचली आहे. कॉर्पोरेट उद्योगांना करात सवलत दिली जात असताना सर्वसामान्यांना आयकरात सूट देण्याबाबत कुठलेही धोरण आखले जात नाही. किमान या विषयावरतरी मनमोहन सिंग यांच्यासारख्या अनुभवी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, त्यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा करून देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतू सत्तेच्या धुंदीतील भाजपचे नेते मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत आहेत. एवढेच काय तर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळविलेले अभिजीत बॅनर्जी यांच्या सारख्यांनाही लेफ्टिस्ट म्हणून हिणविले जात आहे. त्यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी किमान त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा अभ्यास करावा. निर्यात कमी का झाली, उद्योगधंदे विशेष करून ऑटोमोबाईल इंडस्ट्री धोक्यात येण्यास कारणीभूत ठरलेल्या निर्णयांचा विचार करावा. एवढे नाही जमले तरी बॅनर्जी यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराचे कौतुक तरी करावे, असा टोला आनंद शर्मा यांनी लगावला.

संघटीत भ्रष्टाचारातून मिळालेल्या निधीमुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला
भाजप मागील पाच वर्षात जगातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराला संघटनात्मक रुप दिले आहे. यांच्या सत्ताकाळात रिझर्व्ह बँकेने राजकिय पक्षांसाठी ५ हजार ८९५ कोटी रुपयांचे इलेक्ट्रोरल बॉंड जारी केले. त्यापैकी ९५ टक्के पैसा उद्योजकांनी भाजपला दिला आहे. या उद्योजकांना नेमका कोणता फायदा भाजपने करून दिला आणि जनतेला काय फायदा झाला, हे भाजपने एकदा जाहीर करावे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये ८.५ बिलियन डॉलर खर्च झाला. यापैकी ६५ टक्के पैसा एकट्या भाजपने खर्च केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीनंतर बँकांतील ठेवी कमी होत चालल्या आहेत. बँका बुडत असून उद्योगधंदे बंद पडत आहे. भाजपच्या संघटनात्मक भ्रष्टाचारामुळे राबविलेल्या गेलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिकदृष्टया दिवाळखोरीकडे निघाला आहे, असा आरोप आनंद शर्मा यांनी यावेळी केला.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

 

You might also like