काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर ‘त्याच्या’ कानशिलात लगावली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सहकाऱ्याला कानशिलात लगावतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ते आपल्या सहकाऱ्याला फटकारताना दिसत आहे. ही घटना म्हैसूर विमानतळाबाहेरील आहे. व्हिडिओमध्ये सिद्धरमय्या यांच्या आसपास अनेक लोक दिसत आहेत, मग ती व्यक्ती त्यांच्या शेजारी येते. दोघांमध्ये काही संवादही होतो अचानक, सिद्धरमय्या त्याच्या एक कानशिलात लगावतात आणि पुढे निघून जातात. यानंतर चमाट खाल्लेला व्यक्ती मोबाईलवर बोलत निघतो आणि सिद्धारमैयापासून दूर जातो.

सिद्धरामय्या ज्या प्रकारे त्या व्यक्तीशी बोलतात त्यावरून तो व्यक्ती आणि सिद्धरमय्या यांचे जवळचे संबंध असल्याचे दिसून येते. कर्नाटकात कॉंग्रेस – जेडीयूची सत्ता गेल्यानंतरही राज्याचे राजकारण तापलेले आहे. कॉंग्रेसचे आणखी एक वरिष्ठ नेते डी. शिवकुमार यांना ईडीने अटक केली आहे. राज्यात फोन टॅपिंगचा मुद्दाही चर्चेत आहे. कॉंग्रेसचे अनेक संभाव्य नेते प्रचंड तणावात आहेत. सत्तेबाहेर सत्ताधारी भाजप सरकार आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये जोरदार झुंज सुरू आहे. त्यात माजी मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ समोर आल्याने भाजपा सोबतच काँग्रेसचेही नेते संभ्रमात पडले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त