‘कोरोना’वर थरूर यांची कविता, ’पहले गलती से कुछ खाया, अब वो कुछ नर व नारी खा रहा…’, पण झाले ‘ट्रोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी शनिवारी कोरोना व्हायरसची भीषणता दर्शवणारी एक कविता पोस्ट केली आहे. कोरोना व्हायरसवर शशि थरूर यांनी शनिवारी अनेक ट्विट केले, ज्यामध्ये ही एक कविता सुद्धा होती.

थरूर यांनी आपल्या कवितेतून चीनच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, चीनने अगोदर चुकीने काहीतरी खाल्ले आणि आता तो काही माणसांना खात आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे की, प्रत्येकजण घरगुती उपाय सांगत आहे, परंतु समजत नाही की, अखेर कुणाचे ऐकायचे. या कवितेत त्यांनी साबणाने हात चांगल्या पद्धतीने धुण्याचा सल्लाही दिला आहे. परंतु, या कवितेवरून अनेकांनी त्यांना ट्रोलसुद्धा केले.

त्यांच्या कवितेवरून एका युजरने काँग्रेसवर टीका केली. त्याने लिहिले की, हिन्दुस्तान मागील 70 वर्षांपासून कांग्रेस व्हायरस सहन करत आहे, तर कोरोना व्हायरस किस खेत की मुली आहे. तर अन्य एका युजरने म्हटले, कोराना व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. ऐकले आहे की, तुमचे माजी अध्यक्ष सुद्धा इटलीहून आले आहेत.

परंतु, शशी थरूर यांनी या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ट्विट करणे सुरूच ठेवले. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, कोविड 19 सतत भिती पसरवत आहे. अशावेळी प्रोफेशनल काँग्रेसने पथानामथिट्टामध्ये 6000 मास्क वाटले. येथे आतापर्यंत 11 लोकांना कोरोन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी केरळ सरकारला इटलीप्रमाणे ओपन डाटा बेस ठेवण्याचे आवाहन केले आहे.