CM फडणवीसांविरूध्द लढणार्‍या आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा, म्हणाले – ‘नितीन गडकरींचा आशीर्वाद माझ्या सोबत’

पोलीसनामा ऑनलाइन – आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे आणि फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून आशिष देशमुख हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

शेवटच्या दिवशी देशमुख यांनी काँग्रेसकडून आपला अधिकृत निवडणुकीचा अर्ज दाखल केला यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री हे विदर्भद्रोही आहेत त्यामुळे यंदा विदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात बदल घडेल असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच नितीन गडकरी हे मला वडिलांच्या जागी आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत असल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे नावे होऊ शकतो हा विक्रम
२००४ च्या निवडणुकीमध्ये आशिष देशमुखांचे वडील रणजित देशमुख यांनी देखील याच मतदारसंघातून फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर रणजित देशमुख यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती. त्यामुळे जर यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आशिष देशमुख यांना पराभूत केले तर वडील आणि मुलाला पराभूत करणारे ते पहिले राजकारणी ठरतील.

 

Visit : Policenama.com