‘कोरोना’मुळे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीअशी अवस्था झाली होती : अशोक चव्हाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली असून सध्या ते मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. त्यांना बाधा झाल्यानंतर नांदेड येथून मुंबईला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. कोरोना झाल्यानंतर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी अवस्था झाली होती अशी भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षात आजार झाल्यावर जी मानसिकता असते तशीच माझी स्थिती झाली होती. भीतीचे वातावरण होते. रुग्णालयात गेल्यानंतर जेव्हा संपूर्ण रुग्णालयच कोरोनासाठी राखीव असते. तेव्हा बाजूच्याचा संसर्ग होऊ नये अशी भीती वाटत होती. सुरुवातीचे एक-दोन दिवस चिंतेत गेले. विषय संपेल की वाढेल अशी भीती वाटत होती. पण योग्य उपचार झाल्याने वेळेवर बरा झालो, असेही चव्हाण यांनी सांगितले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मी नांदेड जिल्ह्यातच होतो.

लोकांना मदत करण्याचे काम सुरु होते. स्थानिक पातळीवरचे काम करण्यासाठी पुढाकार घेत होतो. मुंबईत विधानपरिषद निवडणुकीसाठी आलो होतो. निवडणूक बिनविरोध झाल्याने लगेचच परत आलो होतो. पण रेड झोनमधून नांदेडला गेल्याने पूर्वकाळजी म्हणून मी घरीच क्वारंटाउन झालो होतो. पण पाचव्या दिवशी एक्स-रे काढला तेव्हा कोरोनाची लक्षणे नजर आली. वेळेवर उपाचर घेतल्याने अवधी कमी लागला आणि डिस्चार्ज मिळाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.