जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावरून अशोक चव्हाणांनी दिला ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील एका कार्यक्रममध्ये केले होते. त्यावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी इशारा दिला आहे. कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर त्याला चोख प्रतिउत्तर दिले जाईल अशा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला तंटे बरे झाले.

काय म्हणाले होते नेमकं जितेंद्र आव्हाड
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला. असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये केले होते.

मात्र त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींच्या बाबत मला प्रचंड आदर आहे असे म्हंटले होते तर इंदिरा गांधी आणि पंतप्रधान मोदींची तुलना होऊ शकत नाही असे देखील आव्हाड एका ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

तर जितेंद्र आव्हाड हे खरे बोलत आहेत शरद पवार, शिवसेना व काँग्रेस त्यांच्या मताशी सहमत असणार असे मत भाजपचे किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –