‘मागील 5 वर्षांमधलं आठवत असेल’, काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सनदी अधिकाऱ्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा असताना विरोधकांकडून सरकारवर याच मुद्यावरून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात सध्या बदल्यांचा वेगळा विभाग करावा अशी टीका राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर बदल्यांमध्ये कोट्यावधींचा व्यवहार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होती. यावर काँग्रेसने पलटवार केला आहे.

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले, फडणवीसांना त्यांनी पाच वर्षात केलेली अशी कामं आठवत असतील, असा टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यात सध्या कोरोनाचं संकट असल्याने एक वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाही तर काय फरक पडतो. या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यातील कोट्यावधींचे व्यवहार केले जात आहेत असा आरोप दवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. राज्यात मागील पाच वर्षात फडणवीस सरकार यांनी जे काम केले आहे ते कदाचीत त्यांना आठवत असेल. आपण काय काम केलं तेच त्यांना आठवत असावं अशी उपरोधक टीकाही त्यांनी केली.

आरोग्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोविड टेस्ट कमी होत असल्याची टीका केली होती. आरोग्य मंत्र्यांनी मात्र फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारच्या आयसीएमआरच्या नियमावली नुसारच राज्यात सर्वत्र चाचण्या घेतल्या जात आहेत. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने टेस्ट जास्त केल्या असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली. तसेच कोविड टेस्टचे दर अजून कमी करणार असून साधारण 1200 ते 1400 रुपयांपर्यंत हे दर आणले जातील अशी माहिती त्यांनी दिली.