‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ ! फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानाला थिल्लरपणा म्हणा-या देवेंद्र फडणवीस (( Devendra Fadnavis ) यांना कॉंग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( (Congress-leader-Balasaheb-Thorat) ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही फडणवीस यांना सुसंस्कृत नेते समजतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधान अपेक्षित नाहीत.सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल गेला आहे. त्यामुळे ते असे शब्द वापरत असल्याची टीका थोरात यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

केंद्रान राज्याच्या हक्काचे पैसे वेळेवर दिले असते तर आज राज्य सरकारवर त्यांच्याकडे पैसे मागण्याची वेळ आली नसती, अस काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करताना म्हटले. त्यावर या परीस्थितीत राज्य सरकार लोकांना काय मदत करणार हे महत्वाच आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौ-यात थिल्लर स्टेटमेंट करण मुख्यमंत्र्याना शोभत नाही, अशी शब्दात फडणवीस यांनी जहरी टीका केली होती.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेल्या टीकेला थोरात यांनी उत्तर दिले आहे. केंद्रान राज्य सरकारचा जीएसटी ((GST) अद्याप दिलेला नाही. केंद्राकडे 30 हजार कोटी रुपये थकलेले आहेत. महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक जीएसटी मिळतो. पण दुर्दैवाने राज्याला हक्काचे पैसे मिळत नाहीत. राज्याच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी फडणवीस आणि भाजप सरकारन मदत करावी, आम्ही त्यांचे कौतुक करू असे थोरात म्हणाले.

केंद्र सरकारकडे आमचे पैसे अडकले आहेत. ते अगोदर द्यावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर फडणवीस म्हणाले, राज्याकडून जीएसटी कमी आला आहे. त्याची भर काढण्यासाठी केंद्राने कर्ज काढून राज्याला पैसे दिले आहेत. मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झाल की केंद्राकडे बोट दाखवाय, तूमच्याकडे हिंमत नाही का. आम्ही सत्तेत असताना लोकांना 10 हजार कोटीची मदत केली होती. यांना मदतच करायची नाही, राज्याचाला 1 लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची मुभा आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात. अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते.

काय म्हणाले होते फडणवीस
लोकांना काय मदत मिळणार हे महत्वाच आहे. अशा प्रकारच्या दौ-यात थिल्लर स्टेटमेंट करण मुख्यमंत्री ठाकरे यांना शोभत नाही. लोकांना मदत करायची यांच्यात हिंमत नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली होती.