राधाकृष्ण विखे पाटलांच्या काँग्रेस ‘घरवापसी’च्या चर्चेवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील राजकारणात होणार संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे विखेंच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांना टोला लगावला आहे.

बाळासाहेब विखेंच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात विखे पाटलांना टोला लगावला आहे. जिथं गेला तिथं नांदा असा टोला बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला. तसेच विखे पाटलांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली का याची आपल्याला माहिती नाही असेही थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेसकडून मुंबईत रॅली काढण्यात आली. यावेळी थोरातांनी ही प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानात ध्वजारोहन करुन गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत भारत बचाओ – संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएए आणि एनआरसीला समर्थन देणाऱ्या भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. याच ठिकाणाहून काँग्रेसचा स्थापना दिवसाचा मार्च काढण्यात आला.

विखेंचा खुलासा –
पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली असल्याचा आरोप विखेंनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अशा अफवा पसरवून मला बदनाम करण्याची कोणीतरी सुपारी घेतली आहे. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. मग मी सार्वजनिक जीवनात कोणाहीली भेटायचे नाही का असा संतप्त सवाल विखेंनी उपस्थित केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/