कॅबिनेट मंत्री थोरातांनी मंत्रिपदावरून सोडलं ‘मौन’, आज अंतिम ‘तोडगा’ निघणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटप आणि मंत्रिपदावरुन आमच्यात कसलेही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्ष याबाबत चर्चा करणार आहेत आणि या चर्चेतून खातेवाटपाबाबत अंतिम तोडगा काढला जाईल असे ही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच हे सरकार तीन पक्षांचे असल्यामुळे कमी मंत्रिपद वाट्याला येऊ शकतात असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भोर येथील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली होती. परंतू संग्राम थोपटे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला कारण त्यांना याबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान थोरातांनी थोपटे यांना फोन करून सांगितले की त्यांचा योग्य वेळी योग्य तो सन्मान करण्यात येईल.

तसेच थोरात म्हणाले की संग्राम थोपटे हे काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते आहेत. आधीपासून त्यांचे घराणे काँग्रेसबरोबर एकनिष्ठ असून त्यांचे वडिल देखील मंत्रिमंडळात होते. मात्र, सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे कमी मंत्रिपद हे पक्षाच्या वाट्याला आले आहेत. तसेच ते म्हणाले की थोपटे यांना मंत्रिपद देऊ शकलो नाही तरी त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाणार आहे.

कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेसभवनात केली तोडफोड
मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संग्राम थोपटे यांना स्थान न दिल्याने भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच पुण्यातील काँग्रेसभवनामध्ये कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि दगडफेक केली.

दरम्यान तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, या पुढे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष अस्तित्वात राहणार नसून आम्ही संग्रामदादा थोपटे समर्थक म्हणून काम करणार असे सांगितले. भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे म्हणाले, यापुढे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी पाय ठेवल्यास त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?