महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी ?, थोरातांनी टोचले अशोक चव्हाण यांचे कान

पोलीसनामा ऑनलाईन – वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करून राज्यातवाद निर्माण केला आहे. याच मुद्द्यावर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात सरकारला घेरलं. अशातच महाविकासआघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडले याची सध्या चर्चा आहे.

नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करताना पक्षाशी, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही असं भाष्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांचे कान टोचले.

यावर नितीन राऊत यांनी बिलात सवलत देण्याची घोषणाही मंत्रिमंडळ, सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. वीजबिला संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

आणखीन काय म्हणाले होते अशोक चव्हाण

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीबाबत घोषणा करण्याच्या आधी मंत्रिमंडळातील सहकारी समवेत चर्चा करायला हवी होती. चर्चा न करताच त्यांनी घोषणा केली, त्यामुळे समस्या निर्माण झाली. राज्यात आर्थिक स्थिती बिकट त्यात वीज बिल माफी बोजा सोपं नाही. यामुळे सरकार वीज बिलात दिलासा देऊ शकत नाही. भाजपाला सत्तेपासून दूर करून महाविकासआघाडी सरकारची सुरुवात झाली. त्यात कोरोनामुळे काही अडचणीही आल्या. आरोग्य विभागात लक्ष पायाभूत सुविधा दिल्या. उत्पन्नापैकी ७० टक्के आरोग्य विभागाला दिले. सार्वजनिक बांधकाम निधी यंदा कमी मिळाला. मागील सरकारने देयक जास्त होती ती अदा करण्यात आली, त्यामुळे व्यवस्था कोलमडली होती आता व्यवसाय सुधारत आहे.

दरम्यान, किती काळ सरकार टिकेल यावर बोलताना चव्हाण यांनी भाजप अपप्रचार करत आहे. भाजपचे काही नेते सत्तापासून दूर राहू शकत नाही, असं बोलत फडणवीसांवर निशाणा साधला.