‘आता दातखिळी बसली आहे का? आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत?’ पडळकरांना भाईंचा सवाल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे गुरुवारी राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून २७ जूनला होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षेला स्थगिती दिली. आता ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, यूपीएससीच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. एमपीएससी रद्द झाल्यावर रस्त्यावर लोळण घालून आंदोलन करणारे यूपीएससी रद्द झाल्यावर महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत. अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टीका केली आहे.

कोरोनामुळे देशात विदारक पिरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाबधितांचा आकडा कमी होत असला तरी संकट अजून टळले नाही. बहुतांश राज्यात ३१मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व सामान्यांचे हाल होत आहे. सरकारी कार्यालयातही १५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती राहण्याचे आदेश काढले आहे. त्यानंतर वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी परीक्षा रद्द केली आहे. त्यावरून भाई जगताप यांनी ट्विटरवरून आमदार पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, राज्य सरकारने एमपीएससी रद्द केली म्हणून पुण्यातील रस्त्यावर लोळण घालत आंदोलन केले होते . मात्र आता यूपीएससी रद्द झाल्यानंतर हे महाराष्ट्र द्रोही कोंतून बिळात जाऊन बसले आहेत असा सवाल करत आता दातखिळी बसली का? अशी टीका आमदार पडळकर यांचे नाव न घेता केली.

७१२ पदांची परीक्षा रद्द
यूपीएससीकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवामध्ये अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. २७ जून रोजी परीक्षा घेऊन ग्रुप ए व ग्रुप बी अशी ७२१ पदे भरली जाणार होती. ही परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसत येते.