‘या’ कॉंग्रेस नेत्याने नगरसेवकाला मागितली ५० लाखांची खंडणी

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन – नगरसेवकाला अनधिकृत बांधलेल्या इमारतीचे माहिती अधिकारात मागवून अपिलात जाण्याची किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका कॉंग्रेस नेत्याने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांत कॉंग्रेस नेत्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार काकडे असे गुन्हाल दाखल करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. तर याप्रकरणी नगरसेवक अरुण जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

२०१६ साली नगरसेवक अरुण जाधव यांनी बांधलेल्या इमारतीप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्यात जामीनीवर सुटल्यानंतर जाधव यांना कुमार काकडे याने अपिलात जाऊन दुसऱ्या बांधकामाची कागदपत्रे मिळाली आहेत. असे सांगत ती कागदपत्रे दाखवून ५० लाखांची मागणी केली. त्यानंतर अब्रू जाईल या भीतीने कुमार नाईक यांच्या मध्यस्थीने सप्टेंबर २०१६ मध्ये १० लाख रुपये दिले. त्यानंतर भुईगाव येथील जाप आळीमधील स्वामी गुरुदत्तच्या आश्रमातील मठामध्ये २७ ऑक्टोबर २०१६ रोजी संध्याकाळी अरुण जाधव यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. त्यानतंर उर्वरित २० लाख रुपये बाजारात मंदी असल्याने ते दिवाळीनंतर देऊ असे जाधव यांनी सांगितले होते. त्यानंतर कुमार काकडे याने व्यवहार झाल्याने पुन्हा दुसऱ्या कोणाला दम देऊ नये म्हणून जाधव यांनी पैसे देताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले. त्यानंतर उर्वरित पैसे न दिल्याने तो नेहमी जाधव यांना धमकावत होता.

You might also like