Congress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘खोटं बोलण्यासाठी तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळायला हवा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फेब्रुवारी 2012 मध्ये केरळच्या 2 मच्छीमारांना (fishermen) केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या आरोप भारताने 2 इटालियन खलाशांवर केला होता. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु होती. मात्र आता न्यायालयाने भारतातील ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता इटलीच्या कायद्यानुसार त्याच देशात पुढील कारवाई होणार आहे. पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदीनी (Narendra Modi) ही कारवाई सौम्यप्रकारे चालल्याची टीका सोनिया गांधीवर (Sonia Gandhi) केली होती. पण आता न्यायालयाच्या निकालावर मोदी सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress leader Digvijay Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. खोट बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हव अशी टीका कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress leader Digvijay Singh) यांनी केली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदीच एक जुन ट्विट व्हायरल होत आहे. त्यावेळी मोदींनी प्रोपगंडा पसरवला असल्याचा एका युजरच्या ट्विटला उत्तर देत सिंह म्हणतात, मी याबद्दल सहमत आहे, खोट बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणे अशक्य आहे. दरम्यान फेब्रुवारी 2012 मध्ये तत्कालीन काँग्रेस (Congress leader) सरकारने या खलाशांना पकडून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी सोनिया गांधीवर टीका केली होती. मॅडम जर एवढ्याच देशभक्त असतील तर त्यांनी या खलांशांना कोणत्या तुरुंगात डांबल हेही सांगून टाकावे, असे ट्विट केले होते.

Wab Title :- Congress Leader | congress leader digvijaya singh attacks pm narendra modi says

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज