PM मोदींनी त्यांच्या आई-वडिलांच्या जन्माचं ‘प्रमाणपत्र’ दाखवावं, आम्ही आमची सगळी कागदपत्रे दाखवू : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनआरसी बाबत देशात मोठं मोठी आंदोलने झाल्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमादरम्यान दिग्विजय सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आई वडिलांचे जन्म प्रमाणपत्र दाखवावे मग देशवासी सरकारला हवी ती कागदपत्रे दाखवतील.

जर भारतात एनआरसी सुरु करण्यात आली तर आम्ही त्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्रे सरकारी अधिकाऱ्यांना दाखवणार नाही दहशतवादाचे गंभीर आरोप असलेले आणि सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे जाकीर नाईक यांच्या अप्रत्यक्ष दाव्याबाबत देखील दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

फरार प्रचारकांच्या दाव्यावर बुधवारी अनेक ट्वीट करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, सप्टेंबर 2019 मध्ये त्यांच्याकडे मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दूत पाठविलेल्या नाईक यांनी व्हिडिओद्वारे सांगितले की, जर त्यांनी कलम 370 चे समर्थन केले तर सरकार त्यांच्या विरोधातील खटले मागे घेईल आणि ते पुन्हा भारतात येऊ शकतील. दिग्विजय सिंह म्हणाले,ज्या जाकीर नाईकला मोदी शहाने देशद्रोही ठरवलेले आहे जर असा व्यक्ती गंभीर स्वरूपाचे वक्तव्य करत असेल तर मोदी शहांनी त्यावर भाष्य करायला हवे. असे म्हणत सिंह यांनी मोदी शहा यांनी या वक्तव्याचे खंडन का केले नाही असा सवाल देखील उपस्थित केला.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, मी मोदी आणि शहांच्या गटा मधील जरी असलो तरी मला या नाईक प्रकरणाची कोणतीही कल्पना नाही. दिग्विजय सिंह हे बळच अफवा पसरवून देशाचे वातावरण खराब करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like