काँग्रेस नेत्याची PM मोदींना खास विनंती, म्हणाले – ‘राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विट करुन केली आहे. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिग्विजय सिंह ट्विट करत म्हणाले, “अशुभ मुहूर्तवर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आता तुम्हीच मोदींना समजावा तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे की, तुम्ही हे सर्व होऊ देत आहात.” असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच दिग्विजय सिंह यांनी ‘सनातन हिंदू धर्मातील दुर्लक्षित केल्याचे परिणाम’ अशा आशयाचं ट्विट करत त्यात म्हटलंय की,

१. राम मंदिरातील समस्त पुजारी कोरोना पॉझिटिव्ह
२. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला राणी वरुन कोरोना पॉझिटिव्ह
३. उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष कोरोना पोज़िईव्ह असून ते रुग्णालयात दाखल
४. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
५. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह
६. कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करत पाच ऑगस्टचा मुहूर्त टाळावा. शंभर वर्षाच्या संघर्षांनंतर राम मंदिर उभारण्याचा योग आला आहे. आपल्या हट्टापायी यात विघ्न निर्माण करु नका, असा सल्ला सुद्धा दिग्विजय सिंह यांनी दिला आहे.

प्रभू राम कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थानाचे केंद्र आहे. हजारो वर्षांच्या हिंदू धर्मातील परंपरेचा तोडमोड करुन नका, असा उल्लेखही दिग्वीजय सिंह यांनी ट्विटमध्ये केला आहे.