‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास इतर देश यशस्वी ठरले मग…’, चिदंबरम यांचा मोदींना सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर अन्य देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत तर भारताला यश का नाही मिळालं असा सवाल माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. देशात सध्या देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या आकड्यानं 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. यावर आता पी चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे.

पी चिंदबरम म्हणाले, भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याला लॉकडाऊन रणनितीचा फायदा उठवता येत नाही असं दिसतंय. 21 दिवसात कोरोनावर मात करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. अन्य देश जर यात यशस्वी झाला आहे तर भारत का यशस्वी झाला नाही हे पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

पी चिदंबरम पुढे म्हणाले, “मी भविष्यवाणी केली होती 30 सप्टेंबरपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांपर्यंत पोहोचेल. परंतु मी चुकीचा ठरत आहे. भारत 20 सप्टेंबरपर्यंतच त्या आकड्यापर्यंत पोहोचेल सप्टेंबरच्या अखेरीस ही संख्या 65 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले.

24 तासांत 86 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 40 लाखांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासात 86 हजार 432 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये बाधितांचा आकडा जास्त वेगानं वाढताना दिसत आहे.