काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून हि माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असे आवाहन गुलाम नबी आझाद यांच्याकडून करण्यात आले आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरुण गोगोई आणि आरपीएन सिंग यांच्यासह इतर काही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच योग्य उपचार घेऊन ते बरे देखील झाले आहेत.