विजयसिंह मोहिते-पाटलांकडून पुन्हा कॉग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर

अकलूज (सोलापूर ) : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून जात असताना आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आज (बुधवार) अकलूज येथे जाऊन मोहिते-पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते -पाटील यांनी भाजपला मदत केली. त्यानंतर आता ते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी अकलूजला जात विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली.

इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीकडूने अद्याप त्यावर भाष्य केले नाही. कारण या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे.

हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादीवर टीका –

हर्षवर्धन पाटलांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेण्यात आला. आघाडीची बैठक झाली जुन्नरची जागा सुटली तर इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचं आहे. तसेच याच मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. त्यामुळे त्यांचा चा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जातं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –