माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येची राजकारणात ‘एन्ट्री’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काॅंग्रेसचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूकीसाठी काॅंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. तर काॅंग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांना पाठींबा दिला आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

बावड्यातील पाटील घराण्याची ३ री पिढी
अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील बावड्यातील पाटील घराण्यातील ३ री पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. अंकिता पाटील या परदेशात शिक्षण घेऊन आल्या आहेत. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत.

गुरुवारी भरणार अर्ज
बावडा लाखेवाडी गटाच्या काॅंग्रेस सदस्या आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर या जागेवर २३ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. सर्वसमावेशक उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काॅंग्रेसकडून अंकिता पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा कऱण्यात आली. त्यानंतर अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही उमेदवारी दिली आहे. तर अंकिता पाटील गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत.

मुलीला राजकारणात आणून पाटील यांनी गिरवला पवारांचा कित्ता
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणलं. त्यानंतर त्या आता तिसऱ्यांदा बारामतीच्या खासदार बनल्या आहेत. त्याचा कित्ता पाटील यांनी गिरवला असल्याची चर्चा सध्या आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये मुलगी अंकिता पाटील यांना राजकारणात उतरवले मात्र त्या सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे राजकारणात आपले स्थान निर्माण करू शकतील का हे त्यांची राजकिय कारकिर्दच ठरवेल.