भाजपकडून विधानसभेसाठी पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर ! हर्षवर्धन पाटील इंदापूरातून लढणार : मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे नेत्यांची भाजपकडे ओढ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसात घेतलेल्या निर्णयांमुळे भाजपची ताकद वाढली आहे. इंदापूरचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे इंदापूरमधील भाजपची ताकद वाढली असून इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपचे उमेदवार असतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बुरूज ढासळला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठ्ठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, निष्ठेने वागायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं आहे. “मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही” असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर खासदार झाले असते..

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील आधी भाजपामध्ये आले असते तर एव्हाना ते खासदार झाले असते असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आरोग्यनामा ऑनलाइन –