‘आयटम’ वरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अडचणीत..निवडणूक आयोगाने घेतली दखल

भोपाळ : काँग्रेस नेते ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली आहे. इमरती देवी या डाबरा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. या ठिकाणी जाहीर सभेत बोलताना कमनाथ यांनी इमरती देवी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतल्याने कमलनाथ आता अडचणीत आले आहेत.

माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवारांबाबत असे विधान करणाऱ्या कमलनाथ यांच्यावर सोशल मीडियात टीका होत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांनी कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्यासाठी मैान व्रत धारण केले होत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते.

या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही जाहीर भूमिका घ्यावी लागली होती. यानंतरही कमलनाथ यांनी ठाम राहत कोणालाही न जुमानण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने याची दखल घेतल्याने कमलनाथ अडचणीत आले आहेत. मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत.

“आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही…काय बरे तिचे नाव?” असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होतो. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते, “माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है.”

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी हे वक्तव्य केले होते.