देखावा बंद करुन भाजपात प्रवेश करावा, ‘CAA’ वरुन ‘कार्ति’ चिदंबरम यांचा रजनीकांत यांच्यावर ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांनी सीएएवरुन मोदी सरकारचे समर्थन करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांतवर हल्लाबोल केला आहे. कार्ति म्हणाले की रजनीकांत यांनी देखावा बंद केला पाहिजे आणि भाजपात प्रवेश केला पाहिजे. त्यांनी हे प्रदर्शन बंद केले पाहिजे की ते वेगळा पक्ष सुरु करण्याच्या तयारीत आहेत.

रजनीकांत यांच्यावर टीका –
रजनीकांत भाजपचे पोपट आहेत, आपल्या मालकाने दिलेले स्क्रिप्ट वाचतात. त्यांनी आता कोडी सोडवणे बंद केले पाहिजे असे कार्ति चिदंबरम म्हणाले. असे पहिल्यांदाच होत आहे की काँग्रेसचा एखाद्या नेता रजनीकांतवर थेट हल्लाबोल करत आहे.

काय म्हणाले रजनीकांत –
रजनीकांत म्हणाले की सीएएमुळे मुसलमानांना कोणताही धोका नाही. जर त्यांना काही अडचणी आल्या तर त्या विरोधात आवाज उठवणारा पहिला व्यक्ती मी असेल. रजनीकांत म्हणाले की केंद्र सरकारने आश्वासन दिले आहे की भारतीय लोकांना सीएएमुळे समस्या येणार नाहीत.

त्यांनी आरोप केला की काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएए विरोधात लोकांना भडकवत आहेत. त्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाला समर्थन देणाऱ्या धार्मिक नेत्यांना जबाबदार धरले आहे आणि हे अत्यंत चूकीचे असल्याचे सांगितले. विभाजनानंतर जे मुसलमान भारतात अडकून पडले त्यांना देशाबाहेर कसे काढणार ?