‘मंदी’पासून वाचण्यासाठी मनमोहन सिंहांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ 5 ‘सल्‍ले’, ‘या’ क्षेत्रांवर ‘फोकस’ करण्याची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदींना आणि मोदी सरकारला काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगितले की, सरकारला नोकरी देणाऱ्या क्षेत्रांना अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी मत मांडले की देश आर्थिक मंदीच्या परिणामातून जात आहे, ही मंदी स्ट्रक्चरल आणि सायक्लिक दोन्ही प्रकारची आहे. 
 
मनमोहन सिंह म्हणाले, पहिल्यांदा स्विकारले पाहिजे की आपण संकटाचा सामना करत आहे. सरकारने सर्व तज्ज्ञांची आणि स्टेकहोल्डर्सचे मत विचारात घेऊन विचार करावा, क्षेत्रांवये घोषणा करण्यापेक्षा सरकारने आता आर्थिक स्थितीला एकत्र पुढे नेण्याचा विचार करावा. त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे पाच पावले उचणे आवश्यक आहे. 
 
मनमोहन सिंह यांनी दिला सल्ला – 
– सरकारला पहिल्यांदा जीएसटीमध्ये सुधार करावा लागेल, मग भले की काही काळ कराचे नुकसान होवो. ग्रामीण उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी आणि शेती पुनर्जीवित करण्यासाठी नव्या पद्धती शोधल्या पाहिजे. काँग्रेसच्या घोषणा पत्रात स्पष्ट पर्याय आहे की, शेती बाजाराला फ्री करुन लोकांकडे पैसे पुन्हा येऊ शकतो.

 – पैसा वाढवण्यासाठी कर्ज मिळणे सोपे झाले पाहिजे, फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच नाही तर NBFC मध्ये देखील फसवणूक होत आहे. कापड निर्मिती, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या प्रमुख नोकरी देणाऱ्या क्षेत्रांना पुनर्जीवित केले पाहिजे. त्यासाठी कर्ज देखील द्यावी लागतील.

– ते असे ही म्हणाले की भारताची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे, तिमाहीचा 5 % जीडीपी विकास दर 6 वर्षातील सर्वात कमी आहे.


– नॉमिनल जीडीपी ग्रोथ देखील 15 वर्षातील खालच्या स्तरावर आहे. त्यामुळे वाहन उद्योगाच्या उत्पादनात कमी आली आहे.

– साडे तीन लाख पेक्षा जास्त लोकांना आपला रोजगार सोडावा लागला आहे. जमिनी खरेदी विक्री क्षेत्रात देखील परिस्थिती काही चांगली नाही.

– कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादनात देखील कमी आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम पाहायला

मिळत आहे. 2017 – 18 या वर्षातील बेरोजगारी 45 वर्षांपेक्षा जास्त उच्चांकीवर आहे. 

You might also like