काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी केली ‘हाउडी मोदी’ची ‘स्तुती’, PM मोदींनी दिलं ‘हे’ उत्‍तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोदींच्या या कार्यक्रमाचे जोरदार स्वागत करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

मिलिंद देवरा यांनी याबाबत एक ट्विट केले आहे त्यात ते म्हणतात, नरेंद्र मोदींचे हे भाषण भारताच्या सॉफ्ट पाॅवर डिप्लोमसीला दर्शवते. माझ्या वडिलांची ओळख अमेरिका आणि भारत यांच्या संबंधाना एका नवीन स्तरावर घेऊन जाणाऱ्यांपैकी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे आदरातीथ्य आणि अमेरिकन भारतीय नागरिकांनी दाखवलेल्या योगदानाचा स्वीकार करणे हे अभिमानास्पद आहे.

याबाबत आभार मानताना पंतप्रधान मोदी म्हणाले, धन्यवाद मिलिंद देवरा, तुम्ही अगदी बरोबर आहात. आमचे परम मित्र मुरली देवरा अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून होते आणि आज जर ते असते तर खूप खुश असते. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केलेलं स्वागत शानदार होते.

या दोघांमधील संवाद इथेच थांबला नाही, देवरा यांनी पुन्हा एकदा ट्विट करत म्हंटले की धन्यवाद ! मुरलीभाईनी राष्ट्राला प्रथम समजून भारत अमेरिकेकतील संबंध चांगले बनवण्याचा प्रयत्न केला. माझ्या सोबत बातचीत करणारे अनेक रिपब्लिकन मित्र हे मानतात की २१ वे शतक भारताचे आहे.

प्रधानमंत्री मोदींनंतर केंदीय मंत्री रिजिजू यांनी सुद्धा मिलिंद देवरा यांचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की मिलिंद देवरा यांच्यातील इमानदार नागरिकाने खरी कमेंट केली आहे. त्यावर देवरा यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

एका बाजूला काँग्रेसचे काही नेते म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश नीतीचा चुकीचा वापर करत आहेत. मात्र मिलिंद देवरांसारखे काँग्रेसचे माजी मंत्रीच मोदींच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

Visit : policenama.com