Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress Leader Mohan Joshi | पुण्याच्या राजेंद्रनगर (Rajendra Nagar Pune) 1004/5 येथील अगोदर पासून पात्र असलेल्या 27 कुटुंबांचे दीर्घकाळ रेंगाळलेले पुनर्वसन त्वरित केले जाईल. त्यासाठी एसआरएच्या जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना हलवले जाईल. उर्वरित कुटुंबाची यादी मनपा विभागीय कार्यालय कडून घेऊन पात्रता तपासून त्यांचे देखील पुनर्वसन त्याच परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या एसआरए इमारतीत केले जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय पुणे महानगरपालिकेत Pune Municipal Corporation (PMC) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Congress Leader Mohan Joshi)

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कॉंग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे (Kiran Moghe) आणि सचिव रेखा कांबळे (Rekha Kamble) या बैठकीत सहभागी झाले होते. तेथील स्थानिक रहिवासी देखील या बैठकीत उपस्थित होते. (Congress Leader Mohan Joshi)

या संदर्भात मोहन जोशी म्हणाले की, राजेंद्रनगर 1004/5 येथील पुनर्वसन रखडलेल्या कुटुंबांनी या संदर्भात कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कडे निवेदन दिल्यावर त्यांच्यासह मी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले.
या वस्तीचे 2007 ते 2013 दरम्यान काहीसे पुनर्वसन झाले. परंतु तेव्हा काही कुटुंबांचे पुनर्वसन झाले नाही.
नंतर 2019 मध्ये आंबिल ओढ्याला पूर आला (Pune Ambil Odha Flood).
शासनाने या परिसरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन (Rehabilitation Of Flood Victims In Pune) करण्याचा
निर्णय जाहीर केला. येथील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घरेलु कामगार महिला आहेत.
या सर्व कुटुंबांच्या प्रश्नाचा पाठपुरावा पुणे जिल्हा घरकामगार संघटना २०१९ पासून करीत आहे.
परंतु पुणे मनपा आणि एसआरए मधील ताळमेळ अभावी त्यांना न्याय मिळत नव्हता.
आता हा निर्णय झाल्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे असे मोहन जोशी म्हणाले.

या पूरग्रस्त नागरिकांना या पूर्वीच न्याय मिळायला हवा होता असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की,
मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी
या कामी मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन निर्धारित वेळेत पूर्ण
करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीतच राहू असे ते म्हणाले.

Web Title :  Congress Leader Mohan Joshi | Pending rehabilitation of flood victims in Rajendranagar is ongoing – Mohan Joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘आम्ही त्यांना पैसे दिले हे…’

Pune Police News | पुणे : बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पोलिसाच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अटकेत; 3 दिवसांची पोलीस कोठडी