Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे पुनर्वसन होणार असून, या प्रकल्पाचे टेंडर ५ हजार कोटी रुपयांना अदानी समूहाने मिळवले आहे. मात्र, या पुनर्वसन प्रकल्पावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या प्रकल्पासंदर्भात अनेक प्रश्न विचारले आहेत.

नाना पटोले (Congress Leader Nana Patole) म्हणाले, “भाजप सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी शेकडो एकर जमीन ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली आहे. यासाठी त्यांनी कोणती टेंडर प्रक्रिया पार पाडली? कशाच्या आधारावर एवढी मोलाची जमीन दिली गेली? इतक्या अचानकपणे राज्य व केंद्र सरकारने ही प्रक्रिया कशी पार पाडली? दुबईच्या सी-लिंक कंपनीने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा भरली होती, पण नंतर सरकरने ती रद्द केली. ह्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? आता एका उद्योगपतीला ५ हजार कोटी रुपयांना ह्या प्रकल्पाचे काम कसे काय दिले?” अशी विचारणा त्यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगला समाचार घेतला. ‘महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी ७०० कोटी रुपये दिले होते, पण त्यावेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही. मग, आताच असे काय घडले, ज्यामुळे ही जमीन रेल्वेने राज्य सरकारला दिली? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. सरकारला आम्ही या हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार आहोत, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

ते म्हणाले, “भाजप सर्वकाही उद्योपतीच्या हितासाठी करत आहे.
या उद्योगपतीला मुंबईतील मोक्याच्या जमिनी देऊन मुंबई लुटण्याचा भाजपचा डाव आहे.
मुंबई विमानतळही याच उद्योगपतीच्या घशात घातले आहे.
भाजप उद्या मुंबईतील कोळीवाड्याची मोक्याची जागासुद्धा या उद्योगपतीच्या घशात घालू शकते.
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सर्वकाही उद्योगपतींच्या हितासाठी करत आहेत.
धारावीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, १७ तारखेच्या मोर्चात धारावीचा मुद्दाही असावा यासाठी मविआच्या
बैठकीत चर्चा करू. राज्यातील आजची परिस्थिती व राज्य सरकारची भूमिका पाहता ईडी सरकार हे
महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वात दळभद्री सरकार आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Web Title :- Congress Leader Nana Patole | congress nana patole criticizes shinde fadnavis govt over dharavi redevelopment deal in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Uddhav Thackeray Group | कोल्हापूरचे मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा नवा मल्ल; वंचितचे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पूना क्लब, इव्हॅनो इलेव्हन संघांचा दुसरा विजय !