आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचा PM मोदींवर ‘घणाघात’, नथुराम गोडसेसोबत केली ‘तुलना’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्य सरकारने नोकरी आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे अनिवार्य नाही आणि आरक्षण मुलभूत अधिकार नाही. यानंतर विरोधी पक्षांकडून आरक्षणावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पीएल पुनिया यांनी आरक्षणावरुन पीएम मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे, हे लोक संविधान मानत नाहीत. एवढेच नाही तर पीएल पुनिया यांनी नथुराम गोडसेंना वादात ओढत पीएम मोदींवर हल्लाबोल केला.

हे लोक संविधान मानत नाहीत –
पुनिया म्हणाले की संविधानांची मूळ भावना समता आणणे, त्यासाठी काही तरी योजना तयार करणे ही आहे. आरक्षण त्यातीलच एक आहे, परंतु हे लोक संविधान मानत नाहीत. हा थेट संविधानवरच हल्ला आहे. लोक म्हणतात की पंतप्रधान जेव्हा दुसऱ्यांदा 2019 मध्ये संसदेत आले तेव्हा त्यांनी संविधानावर डोके टेकवले होते. 2014 साली पहिल्यांदा संसदेत आल्यावर त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोके टेकवले. परंतु त्यानंतर त्यांनी संविधानाच्या प्रक्रियेला बाजूला सारुन कायदे पास करण्यास सुरुवात केली, असे देशाच्या इतिहासात असे कधी झाले नाही.

गोडसे पहिल्यांदा पाया पडला, त्यानंतर गांधीजींना गोळ्या मारल्या. ही तर जुनी परंपरा आहे, यावर जाऊ नका. हे स्पष्ट आहे की आज एससी, एसटी, ओबीसींच्या अधिकारावर हा थेट हल्ला आहे. यात नरेंद्र मोदींपासून अनेक लोक सहभागी आहेत.

आरक्षणाच्या निर्णयाविरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे.

23 फेब्रुवारीला भारत बंद –
चंद्रशेअर आझाद यांनी 23 फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यांनी हा निर्णय आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगितले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी दाखल केली आहे.

You might also like