PM मोदी – HM शहांमध्ये ‘विकृत’ मानसिकता, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंची खरमरीत टीका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये विकृत मानसिकता दिसते, असे विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूरमध्ये आज पूनम गेट समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात ‘भाजप हटवा, देश बचाओ’ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी-शाहांवर सडकून टीका केली. तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमलाही चांगलेच धारेवर धरलं.

भाजप हटाओ, देश बचाओ या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला चांगलेच धारेवर धरलं. देशात सीएए आणि एनआरसी, एनपीआरसारखे कायदे लागू होत असताना दलितांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असताना कुठं गेलं रक्त, कुठं गेली वंचित-एमआयएम असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सर्व भाजपचेच बगलबच्चे आहेत, असा घणाघात करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, वाह रे मोदी तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल असं विधान करून दोन्ही पक्षांवर त्यांनी काडाडून टीका केली. देशात वेगवेगळे कायदे आणून धर्म-जातीच्या आधारे विभागणी केली जात आहे. जात ही देशाला लागलेली कीड आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रथम भारतीय असल्याची भावना येते. कितीही कायदे आणले तरी देशाचे विभाजन होणार नाही, असा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला.

You might also like