पृथ्वीराज चव्हाण विधानसभा ‘अध्यक्ष’ तर अजित पवार ‘उपमुख्यमंत्री’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीकडून सत्तास्थापनेच्या तयारीने जोर धरला आहे. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. परंतू अजूनही कॅबिनेटमध्ये कोणाला कोणते पद मिळणार यावर तिन्ही पक्षात चर्चा सुरु आहे. या दरम्यान वृत्त मिळत आहे की वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष पद मिळू शकते. एवढेच नाही तर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते.

हा असेल फॉर्म्युला –
अशी देखील माहिती मिळत आहे की राज्याच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला आहे. महाविकासआघाडीत कॅबिनेटचा 15-13-13 असा फॉर्म्युला ठरला आहे, ज्यात 15 मंत्रिपद शिवसेनेला, 13 मंत्रिपद राष्ट्रवादीला आणि 13 मंत्रिपद काँग्रेसला असे सत्तावाटप होऊ शकते. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल त्यामुळे शिवसेनेला एकूण 16 मंत्रिपदे मिळतील. आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात येऊ शकते. सोनिया गांधींनी उपमुख्यमंत्रिपद नाकारत त्याऐवजी विधानसभा अध्यक्ष पदाची मागणी केली होती. यावर आता या तिन्ही पक्षात विचारमंथन सुरु आहे. परंतू यावर अधिकृतपणे अजून कोणीही भाष्य केले नाही.

यांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी –
अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अनिल देशमुख, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदावर संधी मिळू शकते. याशिवाय नवे चेहेरे असलेले रोहित पवार, आदिती तटकरे यांना देखील मंत्रीपद मिळू शकते. तसेच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते यांनी मंत्रिपदाची संधी मिळू शकते.

अजूनही बैठका सुरु –
तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अहमद पटेल, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात अजूनही बैठका सुरु आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये आज रात्री शेवटची महत्वाची चर्चा होईल. या दरम्यान शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांची वेगळी बैठक सुरु आहे.

या प्रकारे होणार सत्तावाटप –
मंत्रालयाचे वाटप करताना तीन तीन समान दर्जाच्या मंत्रालयांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यात अर्थ, गृह, शहरी विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. या तिन्ही पदावर तिन्ही पक्षाचे एक-एक मंत्री बसतील असे सांगण्यात येत आहे की गृह मंत्रालयाची मागणी केली आहे तर शहरी विकास मंत्रालयाची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला अर्थमंत्रालय मिळू शकते. यावर आज रात्री शिक्कामोर्तब होईल.

Visit : Policenama.com