Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी (दि.23) शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे संसदीय समितीने राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांची (Congress Leader Rahul Gandhi) खासदारकी रद्द (Cancellation of MP) केल्यानंतर काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधकांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया देताना म्हटले, मी देशाच्या आवाजासाठी लढा देत आहे. मी कोणतीही किंमत चुकवण्यासाठी तयार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला (Modi Government) चॅलेंज दिले आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत (Kolar Election Rally) वादग्रस्त विधान केले होते. नीरव मोदी (Nirav Modi), ललित मोदी (Lalit Modi), नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात? या विधानासंदर्भात भाजप आमदार पूर्णेश मोदी (MLA Purnesh Modi) यांनी राहुल गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फोजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी तक्रारीत केला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने (Surat Court) त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन दिला होता.

Web Title :- congress-leader-rahul-gandhi-first-reaction-after-cancellation-of-mp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’,
प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक,
शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Nashik Crime News | नाशिकमध्ये हल्लेखोरांकडून कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला,
वार करून खून