Congress Leader Rahul Gandhi | ‘मी सावरकर नाही, माफी मागणार नाही’, राहुल गांधी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द (Disqualification) केले. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सदस्यत्व रद्द केल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांच्यावर देखील निशाणा साधला. मोदी आडनावाबाबत माफी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर (Savantrya Veer Savarkar) नाही. मी सभागृहात असो की बाहेर याने मला फरक पडत नाही. मी आवाज उठवत राहणार असे राहुल यांनी सांगितले.

मला बोलण्याची संधी दिली नाही

राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) म्हणाले, भाजप सदस्यांनी माझ्यावर खोटे बोलायला सुरुवात केली की मी परदेशी मदत मागितली आहे. हे सर्वात हास्यास्पद वक्तव्य आहे. मला बोलण्यासाठी संधी दिली पाहिजे अशी मागणी मी अध्यक्षांकडे केली. मात्र तसे झाले नाही. मी दोन वेळा पत्र लिहिले. यावेळी अध्यक्ष म्हणाले मी काही करु शकत नाही.

राहुल गांधी पत्रकारावर भडकले

पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला, तुम्ही देशातील ओबीसींचा (OBC) अपमान केलाय? असा आरोप भाजप करत आहे. यावर बोलताना राहुल गांधी पत्रकारावर संतापले, तुम्ही थेट भाजपचा बिल्ला लावून या, पत्रकार बनून कशाला आला आहेत, असे राहुल म्हणाले, भैय्या देखिए, पहिले आपका अटेम्ट यहाँ से आया, फिर वहाँ से आया… अब यहाँ से आ रहे हो? डायरेक्टली बीजेपी के लिये काम क्यों कर रहे हो? थोडी डिस्कशन करो, थोडे घुमघाम कर पुछो, आपको ऑर्डर दिया है क्या… देखो मुस्करा रहे हो, अगर बीजेपी के लिए काम करा चाहते हो तो उसका झंडा छाती पर लगा लो, फिर मै उसी तरह से जबाब दूँगा, असे राहुल गांधी यांनी भरपत्राकार परिषदेत म्हटलं.

ही माझी तपस्या आहे

कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात राहुल गांधी यांना विचारण्यात आले. यावर बोलताना ते म्हणाले,
हा ओबीसीचा विषयच नाही, तर मोदी आणि अदानी (Adani) यांच्यातील संबंधांचा विषय आहे.
आदानींच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये आले कुठून? या प्रश्नाच उत्तर मला मिळालं नाही. ही माझी तपस्य आहे,
माझ्या आयुष्याची तपस्य आहे. मला तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण मी माझी तपस्या करतच राहणार.
माझ्या पुढील भाषणाने पंतप्रधान घाबरत आहेत, जे मी अदानीवरच करणार होतो.
त्यामुळेच माझं सदस्यत्व रद्द केलं, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

भाजप लक्ष विचलित करतेय

राहुल गांधी पुढे म्हणाले, भारत जोडो यात्रेवरील (Bharat Jodo Yatra) माझे कोणतेही भाषण पहा,
सर्व समाज एक आहेत असे मी नेहमीच म्हटले आहे. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही,
नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधाचा मुद्दा आहे. भाजप लक्ष विचलित करण्याचे काम करते,
कधी ओबीसींबद्दल बोलते, तर कधी परदेशाबद्दल बोलते.

Web Title :-  Congress Leader Rahul Gandhi | rahul gandhi held a press conference and made serious allegations against prime minister narendra modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On Police Inspector Vijay Mane | 1 लाख रूपये किंवा iPhone मोबाईलची मागणी करून लाच घेणार्‍या पोलिस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Pune Crime News | धक्कादायक ! भरधाव कारला अडविणार्‍या ट्रॅफिक पोलिसाला चालकाने बोनेटवरून 50 मीटरपर्यंत फरफटत नेलं, खडकीतील घटना