Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेल्या राहुल गांधी यांना आता त्यांचे शासकीय निवसस्थान खाली (Vacate Government Bungalow) करावं लागणार आहे. राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना 22 एप्रिल पर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना 12 तुघलक रोड येथील बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सोमवारी काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहीती आहे. नोटीसनुसार, अपात्रतेच्या एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करावे लागेल.

सूरतच्या कोर्टाने (Surat Court) गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या विधानाबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते.
याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
त्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
त्यांच्या अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल.

 

Web Title :- Congress Leader Rahul Gandhi | rahul-gandhi-vacate-govermental-
residence-at-12-tuglaq-road-lok-sabha-housing-committee-notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता, पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरे-भाजप युतीबाबत विखे-पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले – ‘त्यामुळे नवी युती करण्याचा…’

Mahindra e-Alfa | 50000 वी इलेक्ट्रिक महिंद्रा ई-अल्फा हरिद्वार येथील कारखान्यातून बाहेर पडली

TORK Motors | टॉर्क मोटर्स पुणे डीलरशिपने वितरित केल्या 50 मोटारसायकल्स

Pune Crime News | जनमित्रांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना तत्काळ अटक; थकबाकीमुळे वीजपुरवठा केला होता खंडित

Maharashtra Police – DG Medals | DG पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव