राहुल गांधीचा फिटनेस फंडा, अवघ्या 9 सेंकदात मारले 13 पुशअप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी वारंवार दक्षिणेकडील राज्यात दौरे करत आहेत. पुडुचेरी, केरळ आणि आता तामिळनाडू या प्रत्येक दौऱ्यात राहुल गांधींचा नवा अवतार लोकांना पाहायला मिळत आहे. सध्या राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून ते सोमवारीही (दि. 1) एका वेगळ्या अंदाजात दिसून आले. कन्याकुमारीत राहुल गांधींनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला. त्यावेळी ते एका युवतीसोबत पुशअप करताना दिसून आले. त्यांचा जो व्हिडीओ समोर आला, त्यात ते 9 सेकंदात 13 पुशअप्स मारताना दिसतात. सध्या राहुल गांधी यांच्या फिटनेस फंडा सोशल मीडियात चर्चेचा विषय असून लोकही त्यांचे फिटनेसचं कौतुक करत आहेत.

राहुल गांधींनी याठिकाणी मुलांसोबत संवाद साधला. यावेळी युवकांनी त्यांना पुशअप्स करण्याची विनंती केली. त्यानंतर लगेच त्यांनी व्यासपीठावर युवकांसोबत पुशअप केले. तसेच युवकांनी त्यांना एका हाताने पुशअप्स करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा एका हाताने पुशअप्स करून दाखले. राहुल गांधींना ज्या विद्यार्थिनीने पुशअप्स चॅलेंज दिले ती दहावीत असून तिचे नाव मेरोलिन शेनिघा असे आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात गेले होते. ते स्वत: समुद्रात उडी मारून मच्छिमारांसोबत पोहताना दिसून आले. यावेळी त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता, ज्यात राहुल गांधी सिक्स पॅक एब्स दाखवताना दिसत होते. दरम्यान राहूल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटत की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत असे म्हणाले.