Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं संपणार नाही कोरोना, फक्त टेस्टिंगचं आहे उपचार, राहुल गांधींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे पत्रकार परिषद घेतली. राहुल म्हणाले की, ‘माझ्या सूचनांना टीका म्हणून ऐकू नका त्यापेक्षा एक सल्ला म्हणून ऐका. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिकाधिक चाचण्या कराव्या लागणार आहेत. लॉकडाऊन एक पॉज बटण आहे, उपचार नाही. जेव्हा आपण लॉकडाऊनमधून बाहेर येऊ, तेव्हा पुन्हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनद्वारे सरकारला वेळ मिळाला जेणेकरुन ते संसाधनांची जमवाजमव करू शकतील, ते कोरोनाशी लढू शकतील. सरकारला माझा सल्ला आहे की शक्य तितक्या चाचण्या करा.’

राहुल यांनी म्हटले, ‘कोविड व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या मुख्य सैन्य जिल्हा व राज्याची एकके आहेत. केरळ, वायनाडमध्ये प्रगती आहे, हा जिल्हा घटकांच्या कामकाजाचा परिणाम आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिल्हा घटकांना बळकट केले पाहिजे.

मागच्या दिवसात सरकारद्वारे खासदार निधी पुढील दोन वर्षांसाठी स्थगित करण्याबाबत राहुल म्हणाले, ‘या गंभीर परिस्थितीत हा काही मोठा मुद्दा नाही. माझी मुख्य सूचना अशी आहे की सरकारने रणनितीने काम करावे. लॉकडाऊनने काही झालेले नाही केवळ टळले गेले आहे. राज्यांचा जीएसटी त्यांना देण्यात यावा. राज्यांना देण्यात आलेल्या पॅकेजवर राहुल म्हणाले की, ज्या वेगाने पैसे पोहचायला हवे ते पोहोचत नाही.

आपल्याला पक्षनिष्ठतेपेक्षा जास्त काम करावे लागेल – राहुल
राहुल म्हणाले, बेरोजगारी येणार असून सरकारने यासाठी तयारी करायला हवी. देशात दोन प्रकारचे झोन असावेत. एक हॉटस्पॉट आणि दुसरा नॉन-हॉटस्पॉट. छोट्या उद्योजकांना मदत करावी लागेल.’ राहुल म्हणाले, ‘काही लोकांशी संवाद साधल्यावर ही बाब समोर आली आहे कि कोविडवर नियंत्रण ठेवता येऊ शकत नाही पण त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे.’

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की बर्‍याच चुका झाल्या ज्या आता एक मोठ्या समस्या बनल्या आहेत. केंद्राला यावर रणनीतिकरित्या काम करावे लागेल. अन्नधान्याच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, देशात धान्याची कमतरता भासणार असून त्यासाठी सरकारने तयारी केली पाहिजे. कोविडच्या लढाईसाठी आपल्याला पक्षनिष्ठतेपेक्षा जास्त काम करावे लागेल.

राहुल म्हणाले, ‘कोविड -१९ चा सामना करण्यासाठी सरकारने संसाधनांचा प्रभावीपणे उपयोग केला पाहिजे, तो राज्यांना द्यावा आणि सोबतच गरिबांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘फूड नेट’ तयार केले पाहिजे, न्याय योजना लागू करा.’ राहुल गांधी म्हणाले की ‘मी नरेंद्र मोदींशी बर्‍याच मुद्द्यांबाबत असहमत आहे पण आता वाद घालण्याची वेळ नाही. एकत्र होऊन व्हायरसशी लढू.’