अयोध्येत भूमिपूजन होताच राहुल गांधींचे ट्विट, म्हणाले..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अयोध्येत स्वागत केले.

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, राम प्रेम हैं. वे कभी घृणा में प्रकट नही हो सकते. राम करुणा है. वे कभी क्रूरता में प्रकट नही हो सकते. राम न्याय है. वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तत्पूर्वी काल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मोदींच्या हस्त राम मंदिराचा शिलान्यास
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण नऊ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलल्ला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा भूमिपूजन सोहळा दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पार पडला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like